स्पाईस जेटची अनेक उड्डाणे उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या विमानतळावर स्पाईस जेटच्या अनेक विमानांना उड्डाण करण्यास उशीर झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. दुबईला जाणाऱया एका विमानाला तब्बल 30 तास उशीर झाला. तर दुसऱ्या विमानाला 19 तास उशीर झाला. एवढा मोठा उशीर झाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी स्पाईस जेट कंपनीविरोधात विमानतळावर आंदोलन केले. ऑपरेशनल अडचणींमुळे स्पाईस जेटच्या अनेक विमानांवर परिणाम झाल्याचे स्पाईस जेट प्रशासनाकडून सांगण्यात आले.