दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खाणाऱ्यांची सालपट काढली पाहिजे, शिवसेनेचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या घरात दिव्याला तेल नाही, अशा परिस्थितीत राज्यकर्ते दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खात आहेत. तुमच्यात थोडी तरी संवेदनशीलता आहे की नाही? असा खरमरीत सवाल शिवसेनेचे नेते-आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला केला. तसेच अल्पोपहार करण्यास हरकत नाही. परंतु काजू-बदाम खाणाऱ्यांची नागरिकांनी हातात हंटर, रुमणे घेऊन सालपट काढली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

दानवे यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असून त्यांच्या घरात दिव्याला तेल नाही, अशा परिस्थितीत राज्यकर्ते दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खात आहेत, असे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले आहेत, बैठकीत अल्पोपहार करण्यास हरकत नाही. परंतु काजू-बदाम खाणाऱयांची नागरिकांनी हातात हंटर, रुमणे घेऊन सालपट काढली पाहिजे. तसेच गोरे इंग्रज नागरिकांवर अन्याय करत होते, त्याप्रमाणे सरकारमधील काळे-गोरे इंग्रजासारखच वागत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.