मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्तीची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना मतदार यादीशी संबंधित विविध कामे करता येणार आहेत. 18 वर्षांवरील नागरिकांना नाव नोंदणी आणि दुरूस्ती करता येणार आहे.

आजपासून मतदान केंद्रांवर या विशेष शिबिरांना सुरूवात झाली असून ती 20 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी सुरू राहणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या शिबिरांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. या शिबिरांमध्ये केवळ नवीन नोंदणीच नाही, तर मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर माहितीमध्ये काही चुका असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची सुविधाही मिळणार आहे.