
मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये ‘पैसे द्या व वापरा’ या तत्त्वावर 15 अत्याधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्यासाठी पालिकेने निविदा आमंत्रित केल्या आहेत. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 15.30 कोटी रुपये असून, पावसाळ्यासह 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पेंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान-नागरी 2.0’ अंतर्गत प्रोत्साहन देण्यात आलेल्या ‘ऑस्पिरेशनल टॉयलेट्स’ या संकल्पनेवर ही प्रसाधनगृहे आधारित असतील.
यामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष सोय असेल. यासाठी प्रसाधनगृहांमध्ये आरोग्य व सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, सीसीटीव्ही देखरेख आणि आकर्षक वास्तुरचना असणार आहे.
प्रस्तावित 15 ठिकाणे
- आनंदवन पोलीस चौकीजवळ, वाकोला
- विमानतळ प्राधिकरणाचे वाहनतळ, विलेपार्ले (पश्चिम)
- जुहू समुद्रकिनारा, विलेपार्ले
- वर्सोवा समुद्रकिनाऱ्याजवळ
- यशराज स्टुडिओजवळ
- फन रिपब्लिकजवळ
- अंधेरी रेल्वे स्थानक परिसर
- शीतलादेवीजवळ, अंधेरी
- एनएमआयएमएससमोर
- आरे गार्डन तलावाजवळ
- मृणालताई गोरे उड्डाणपूल
- अक्सा समुद्रकिनाऱ्यांजवळ
- महाराणा प्रताप मैदान
- नॅशनल पार्क उड्डाणपुलाजवळ, बोरिवली





























































