
मुंबईतील खार येथील उद्योजक, चॉकलेटीयर, पेस्ट्री शेफ संकेश बांगेरा यांनी स्वप्नातल्या चॉकलेटच्या बंगल्यासारखाच चॉकलेटचा बाप्पा तयार केला आहे. संकेश यांनी हा बाप्पा पुणे येथील जय फूड्स यांच्यासाठी बनवला आहे. चॉकलेटपासून तयार केलेली ही बाप्पाची मूर्ती 4 फूट उंच असून 75 किलो वजनाची आहे.
संकेश यांचे खार येथे पॅफे ‘खोबेक अॅण्ड पंपनी – द केक रूम’ नावाचे दुकान आहे. त्यांनी युनायटेड किंगडममध्ये ‘क्युलिनरी आर्टस्’चे म्हणजेच पाककलेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी हिंदुस्थानसह परदेशातील अनेक मोठय़ा ब्रँड्ससोबत काम केलेले आहे. त्यांच्या कामाच्या अनुभवातून त्यांनी हा चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. हा बाप्पा साकारण्यासाठी त्यांना तीन दिवसांत एकूण 36 तासांचा कालावधी लागला. या कामासाठी संकेश यांच्यासोबत त्यांचे शेफ शेबान अली आणि शेफ संदेश पवार यांनीही सहकार्य केले. त्यांनी बाप्पाचा चेहरा, सोंड, हात, मुकुट, दागिने, शस्त्र, वस्त्र आणि ‘मूषक’ यावर स्वतंत्रपणे काम केले.





























































