
तुमचे फोटो आणि संपर्क सुरक्षित ठेवण्यासाठी Google Photos किंवा Google Drive वर लॉग इन करून डेटा उपलब्ध आहे का ते तपासा.
गॅलरी किंवा फाईल मॅनेजरमधील ‘Trash’ किंवा ‘Recently Deleted’ पह्ल्डर तपासा, जिथे डिलीट झालेला डेटा 30 दिवसांपर्यंत राहतो.
अत्यंत महत्त्वाचा डेटा असल्यास यूएसबी केबलच्या मदतीने फोन कॉम्प्युटरला जोडून अधिकृत डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरचा वापर करू शकता.
आपल्या संगणकावर इजी यूज मोबी सेवर किंवा अॅड्राइड डाटा रिकवरी अॅप यांसारखे काही अॅप्स इन्स्टॉल करून घ्यावे. चाचणीसाठी हे अॅप्स विनामूल्य उपलब्ध आहेत.
मेमरी कार्डमध्ये आपले फोटो, व्हिडीओ आणि इतर मौल्यवान माहिती असते. त्यातील डेटा नष्ट होण्याचा धोका असतो. त्यात काही खराबी असेल तर कार्ड कधीही फॉरमॅट करू नका.




























































