
बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगा आणि मुलीच्या कथित छेडछाडीप्रकरणी पोलिसांनी सोमवारी 3 जणांना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
जमुईचे पोलीस अधीक्षक (SP) विश्वजीत दयाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना 19 सप्टेंबरच्या संध्याकाळी घडली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीप्ती मोनाली यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. या पथकाकडून घटनेत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
“घटनेला दोन दिवस झाले होते. मात्र, रविवारपर्यंत पीडित मुलगी किंवा मुलाने आमच्याकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. सोमवारी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम्ही त्यात दिसणाऱ्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने पीडितांपर्यंत पोहोचलो,” असे SP विश्वजीत दयाल यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांनी एफआयआरमध्ये कोणत्याही आरोपीचे नाव दिलेले नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 7 जणांची ओळख पटवली आहे.
यापैकी 3 जणांना पोलिसांनी अटक केली असून, इतर संशयितांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे.
#WATCH | Jamui, Bihar: On a viral video from Jamui showing a boy being assaulted and a girl being groped, SP Vishwajeet Dayal says, “An FIR has been registered regarding the incident of molestation and indecent behavior by anti-social elements shown in the video, and a SIT has… pic.twitter.com/1JGCjWji5M
— ANI (@ANI) September 21, 2026

























































