जातनिहाय जनगणनेनंतर उत्तर प्रदेशचे चार तुकडे होणार, मोदी सरकारमधील मंत्र्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे लवकरच चार स्वतंत्र राज्यांमध्ये विभाजन होणार असून, स्वतंत्र होणाऱ्या पूर्वांचल राज्याला राजभर समाजाचाच पहिला मुख्यमंत्री लाभेल, असा खळबळजनक दावा उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि ‘सुहेलदेव भारतीय समाज पार्टी’चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्याला आश्वासन दिल्याचा दावाही त्यांनी जाहीर सभेत केला.

आंबेडकर नगर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलताना राजभर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या कथित संभाषणाचा दाखला दिला. ते म्हणाले, “जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्यानंतर राज्याचे विभाजन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. जातनिहाय जनगणनेनंतर आपण राज्याची विभागणी करू, असा शब्द खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी दिला आहे.” उत्तर प्रदेशात राजभर यांचा पक्ष सध्या सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष आहे.