शक्तिधाम रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू; डॉक्टर बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बडतर्फची कारवाई करण्यात आली असून डॉक्टर आणि कर्मचाऱयांची नियुक्ती करणाऱया संबंधित पंत्राटदार पंपनीवरही दंडात्मक कारवाई केली आहे.

रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची प्रपृती आणि बाळाची स्थिती गंभीर असताना कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने स्त्राrरोग तज्ञ डॉक्टरांना कल्पना देणे अत्यंत गरजेचे होते. मात्र डॉक्टरांनी याबाबत कोणतीही माहिती वरिष्ठ डॉक्टरांना दिली नाही. याच निष्काळजीपणाचा आणि हलगर्जीपणाचा फटका निष्पाप नवजात बाळाला बसला. या घटनेनंतर टीकेची झोड उठल्यानंतर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले होते.