
ओमानच्या समुद्रात ‘एमव्ही केप दाओ’ या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला. सूरज यादव असे त्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. ओमानच्या रॉयल नेव्हीने जहाजावरील इतर 19 हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. हल्ल्यात सूरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली.
अफगाणी नागरिक एअरपोर्टवर ताब्यात
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी एका अफगाणी नागरिकाला अटक केली. अमजद हा दुबईला जाण्यासाठी विमानतळावर आला होता. इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्याच्या पासपोर्टची तपासणी केली असता तो हिंदुस्थानी असल्याचे दिसून आले, पण तो भाषेवरून अफगाणी असल्याचा संशय आल्याने त्याची कसून चौकशी केल्यावर तो अफगाणी नागरिक असल्याची कबुली दिली.




























































