
निवडणूक आयोगाने काल (दि. 22) शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक 2026चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातत एकूण 91 हजार 400 पदवीधर, तर 10 हजार 215 शिक्षक मतदारांची नोंद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 27
ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याततील मतदारसंख्या 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध अंतिम मतदारयादीनुसार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्याततील एकूण 91 हजार 400 पदवीधर मतदार असून, त्यामध्ये 62 हजार 343 पुरुष, 29 हजार 50 महिला आणि 7 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. तसेच, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यातत एकूण 10 हजार 215 शिक्षक मतदार आहेत. पदवीधर मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीच्या दिनांकाचा पदवीधारक/पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनी तसेच अंतिम मतदारयादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र व्यक्तींनी पदवीधर मतदारयादीत नाव दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 26 सप्टेंबर 2026 आहे. शिक्षक मतदार नोंदणीसाठीसुद्धा हीच मुदत आहे.





























































