निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे – तेजस्वी यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवरून सध्या सुरू असलेल्या राजकीय वादात आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

तेजस्वी यादव यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम न करता भाजपच्या दबावाखाली आणि इशाऱ्यावर काम करत आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी) जेव्हा मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवर अधिकृतपणे आक्षेप नोंदवला, तेव्हाच या सर्व गैरप्रकाराचा आणि निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.”

मतदार याद्यांच्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आणि मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या संदर्भात बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. लोकशाहीवर हा थेट हल्ला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच या गैरव्यवहाराबद्दल त्यांना अटक करण्यात यावी.”