मुंबईसह उपनगरात ‘महसूल लोक अदालत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह उपनगरांमध्ये ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाशी संबंधित अर्धन्यायिक अपील प्रकरणांचा तातडीने आणि परस्पर संमतीने निपटारा करण्यासाठी हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानांतर्गत जिह्यात तीन टप्प्यांत लोक अदालत कॅम्प पार पडणार आहेत. अंधेरी, वांद्रे व विलेपार्ले क्षेत्रासाठी 22 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील प्रशासकीय इमारत येथे पहिला कॅम्प आयोजित केला आहे. कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व मुलुंड क्षेत्रासाठी 24 डिसेंबर रोजी मुलुंडच्या टोपीवाला कॉलेज इमारत येथे दुसरा कॅम्प होईल. तर बोरिवली, मालाड व गोरेगाव क्षेत्रासाठी 25 मार्च रोजी बोरिवलीच्या एस. व्ही. रोड येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयात तिसरा कॅम्प पार पडेल.