
आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डातील अप यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या अनुषंगाने कसारा स्थानकात 7 ऑक्टोबर 2026 ते 18 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डातील अप यार्ड लाईन विस्तारीकरण (इगतपुरी बाजू) या कामांच्या अनुषंगाने ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ (Pre-NI), ‘नॉन-इंटरलॉकिंग’ (NI) आणि ‘पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग’ (Post-NI) कामांसाठी कसारा येथे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
7 ऑक्टोबर 2026 ते 9 ऑक्टोबर 2026 रोजी ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.
सीएसएमटीवरून 13.10, 14.17, 14.46 आणि 16.50 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी-कसारा लोकल गाड्या आसनगाव स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. कसारा येथून 15.35, 16.16, 17.02 आणि 18.17 वाजता सुटणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकल गाड्या अनुक्रमे 16.12, 16.54, 17.39 आणि 18.54 वाजता आसनगाव स्थानकावरून सुटतील.
7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल 12.30 वाजता सीएसएमटीवरून सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कसारावरून 14.42 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल 18.28 वाजता सीएसएमटीवरून सुटेल. ब्लॉकनंतरची सीएसएमटीला जाणारी पहिली लोकल कसारावरून 20.35 वाजता सुटेल.
8 ऑक्टोबर रोजी रात्री 23.14 वाजता टिटवाळावरून सुटणारी टिटवाळा-ठाणे लोकल आणि 9 ऑक्टोबर रोजी 3.51 वाजता कसारावरून सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येईल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल 21.32 वाजता सीएसएमटीवरून सुटेल. कसारावरून शेवटची लोकल 22.00 वाजता सुटेल. कसारासाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल 4.19 वाजता सीएसएमटीवरून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल कसारावरून 4.59 वाजता सुटेल.
खालील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
- एलटीटी (LTT)-बनारस एक्सप्रेस ही गाडी आता 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4.00 वाजता एलटीटी (LTT) वरून सुटेल.
- एलटीटी (LTT)-पाटलीपुत्र एक्सप्रेस आता 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4.15 वाजता एलटीटी (LTT) वरून सुटेल.
- सीएसएमटी (CSMT)-अमृतसर एक्सप्रेस आता 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4.00 वाजता सीएसएमटी (CSMT) वरून सुटेल.
- सीएसएमटी (CSMT)-बनारस महानगरी एक्सप्रेस आता 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4.15 वाजता सीएसएमटी (CSMT) वरून सुटेल.
- एलटीटी (LTT)-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस आता 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 4.30 वाजता सीएसएमटी (CSMT) वरून सुटेल.





























































