
परतीच्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. मान्सूनच्या परतीच्या प्रवासानंतर ऑक्टोबर हिटला सुरूवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात उष्णतेचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कडक उन्हामुळे आरोग्य, शेती, जलसाठ्यांवर विपरीत गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुढील 60 ते 72 तासांत मुंबईतील तापमानात मोठी वाढ होऊन 2-3 ऑक्टोबरच्या सुमारास अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होईल. तसेच आठवड्याच्या शेवटी तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ऑक्टोबरमध्ये राज्यातील बहुतांश भागांत कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाड्यातील बहुतांश भागांतील दिवसाचे तापमान वाढण्याची दाट शक्यता असून, उष्णतेचा जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांत कमाल व किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता.
कोकण,मराठवाड्यातील बहुतांश भागांत दिवसाचे तापमान वर राहण्याची दाट शक्यता.
आरोग्य,शेती,जलसाठे इ.वर उष्णतेचा heat stress होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक pic.twitter.com/4AcGgbiO1O— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 1, 2026




























































