आम्ही पूर्ण ताकदीने पूर्णेकर कुटुंबीयांसोबत, गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची ठाण्यातील निवास्थानी भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे सांगितले.

”आम्ही पूर्ण ताकदीनिशी पूर्णेकर कुटुंबासोबत आहोत. जे कुणी या प्रकरणातील गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाने अवघे ठाणे हादरले. पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.

मोक्का लावून अटक करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आरोपींवर मोक्का लावून त्यांना अटक करा अशी जोरदार मागणी केली. या हत्येतील मुख्य संशयित आणि कारस्थानाचे सूत्रधार माजी महापौर मीनाक्षी शिंदेंसह त्यांचे पती राजेंद्र शिंदेवर हत्येचा गुन्हा नोंदवा, असेही ते यावेळी म्हणाले.