
भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 2 ऑक्टोबरला सीजेपीतर्फे मुंबईत आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी झाले असून ग्यानू मस्ट गो… अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सीजेपी अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर पुढील आंदोलन होणार असल्याची घोषणा केली. मात्र या आंदोलनापूर्वीच सरकार आपल्याला आणि इतर प्रमुख नेत्यांना अटक करण्याचा कट रचत असल्याचा गंभीर दावा CJP चे प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे.
🚨URGENT NEWS🚨
The government is planning on arresting me, Abhijeet, Ashutosh, Ratna and other Cockroach Janta Party leaders.
If the government thinks that such dictatorial actions will work, then they are mistakened! The young generation has awakened. We appeal to everyone to continue fighting for our rights and future, with or without us. We have always been ready to face the jail or worse. But this will be a big mistake. The young will not tolerate this.
The protests must continue. People of India should ensure the biggest mobilisation starting October 10th.
@Cockroachisback
— Saurav Das (@SauravDassss) October 4, 2026
सौरव दास यांनी रविवारी रात्री उशिरा X पोस्ट करत याबाबत माहिती दिली. सरकार मला, अभिजित दिपके, आशुतोष रांका, रत्ना सिंह आणि इतर CJP नेत्यांना अटक करण्याच्या तयारीत आहे. जर सरकारला वाटत असेल की अशा दडपशाहीने तुम्ही जिंकाल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. अशा प्रकारच्या हुकूमशाही कारवायांमुळे आंदोलन दाबून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न पूर्णपणे फोल ठरेल, असे सौरव दास म्हणाले.
तुमच्या अशा कारवायांमुळे तरुण पिढी मागे हटणार नाही असा इशारा देत दास यांनी जनतेला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण तुरुंगात जाण्यास किंवा कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार आहोत. देशातील तरुणाई हा अन्याय सहन करणार नाही आणि 10 ऑक्टोबरपासून सुरू होणारे हे जनआंदोलन अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असे सौरव दास यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Kitno ko arrest karoge @AmitShah?
10 Oct ko poora desh aa raha hai…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 4, 2026
सौरव दास यांच्या या पोस्टवर अभिजीत दीपके यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आणखी किती लोकांना अशा प्रकारे अटक करणार आहात असे म्हणत अमित शहा यांना टॅग केले आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA), राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) किंवा तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देऊन लोकांना आंदोलनापासून लांब करता येणार नाही. लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात CJP महिनोन महिने किंवा वर्षोन वर्षे तुरुंगवास भोगायला तयार आहे, परंतु हा लढा कधीही थांबणार नाही असा ठाम निर्धार अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला.
























































