
क्रिकेट म्हणजे चाहत्यांच्या मनोरंजनाचा एक जबरदस्त माध्यम. त्यामुळे जगभरात फुटबॉलनंतर क्रिकेटवेड्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. क्रिकेटच्या मैदानावर अशा काही रंजक गोष्टी घडतात, ज्याची चर्चा वर्षानुवर्षे केली जाते. अशीच एक अजब घटना कॅनडा सुपर 60 लीगमध्ये पाहायला मिळाली. टोरंटो सिक्सर्स आणि मिसीसौगा मास्टर्स यांच्यात सामना रंगला होता. वेगवान गोलंदाज अली खानने असा एक बाऊन्सर टाकला तो थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर गेला. फलंदाजीला उभा असलेला पोलार्ड सुद्धा पाहतच राहिला.
या थरारक सामन्यात टोरंटो सिक्सर्सच्या डावातील नववे षटक अली खान टाकत असताना समोर दिग्गज किरोन पोलार्ड फलंदाजी करत होते. अली खानने अतिवेगात मारलेला तो बाऊन्सर इतका धोकादायक ठरला की, चेंडू खेळपट्टीवर टप्पा खाऊन थेट षटकाराच्या रूपाने बाहेर निघून गेला. नियमांनुसार चेंडू बॅटला न लागल्यामुळे पंचांनी त्याला 7 ऐवजी 5 वाईड रन जाहीर केले. अली खानचा हा बाऊन्सर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
First in my bloodline to see wide ball go for Six (6wd) https://t.co/3NWky1KtpT
— Dinda Academy (@academy_dinda) October 5, 2026

























































