
उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार केल्याची घटना बारामती विमानतळ परिसरातील कटफळ गावाजवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यात ते गंभीर जखमी असून त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
राणा सूर्यवंशी हे शिपिंग कंपनीचे मालक आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्याचे सांगण्यात आले. गडचिरोली जिह्यात गरीबांसाठी रुग्णालय उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच झाले.
दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर केला आहे.

























































