
कोलकाता येथील चोरबागान दुर्गापूजा मंडपामध्ये शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आयोजकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अरुंद गल्ल्या, स्वयंसेवकांची अपुरी संख्या, पावसामुळे मंडपात शिरण्यासाठी लोकांची झालेली घाई आणि मंडप कोसळू शकतो, असा इशारा देणाऱया अनाऊन्समेंटमुळे गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन चेंगराचेंगरी झाली, अशी प्राथमिक माहिती आहे.
कोलकात्याच्या मंडळाला मिळालेला शासनाचा पुरस्कार
कोलकाता येथील प्रसिद्ध चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडळाला पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागातर्फे प्रतिष्ठत ‘देवी दुर्गा सन्मान 2026’ मिळाला होता. या पुरस्कारांतर्गत चोरबागान मंडळाचा ‘बेस्ट ऑफ द बेस्ट’ (सेरार सेरा) या सर्वोच्च श्रेणीमध्ये तिसरा क्रमांक आला होता.

























































