
गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला ज्याप्रकारे बेकायदा अटक आणि स्थानबद्ध करण्यात आले आहे, त्यावरुन आमच्यावर कायदेशीर दबाव आणून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आम्ही या दबावासमोर न झुकता पूर्ण ताकदीने हा लढा सुरुच ठेवू, अशा शब्दांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ठणकावले आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी दीपके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी दीपके यांच्याकडून शांतता करारावर स्वाक्षरी घेण्यात आली होती. या सर्व घडामोडींवरुन अभिजीत दीपके यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले, की काही दिवसांपासून बेकायदा अटक आणि कारवाई करण्यात येत आहे. यामुळे आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यावरून आम्हाला घाबरावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, आम्ही या दबावाला बळी न पडता पूर्ण ताकदीने हा लढा सुरुच ठेवू, असे दीपके यांनी ठणकावले.
लवकरच पुढील रणनीती आखणार
सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सुटका झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र येऊ. पुढील रणनीती आखून या लढय़ाची पुढची दिशा निश्चित केली जाईल, असे दीपके यांनी सांगितले.

























































