लातूरातील अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील राजीव नगर भागातील अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका युवकाविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची अल्पवयनी मुलगी घरातून कपडे शिवण्यासाठी जाते असे सांगून गेली होती. परंतु नंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. आपल्या मुलीस महेश अंगद सन्मुखराव (रा.म्हाडा कॉलनी, लातूर) याने फूस लावत पळवून नेले, अशी तक्रार दिली आहे. या दिलेल्या तक्रारीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात महेश सन्मुखराव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.