कलानगर फ्लायओव्हरजवळ आकर्षक ‘पब्लिक प्लाझा’, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारंजे, हिरवळ, रोषणाई आणि अनेक सुविधा असणारा आकर्षक ‘पब्लिक प्लाझा’ वांद्रे कलानगर येथील फ्लायओव्हरजवळ साकारला जाणार आहे. ‘एमएमआरडीए’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ‘पब्लिक प्लाझा’मुळे वांद्रे परिसरात आणखी एक आकर्षण स्थळ उपलब्ध होणार आहे.

बीकेसीत पायाभूत सुविधांबरोबरच ‘एमएमआरडीए’कडून बीकेसी आर्ट डिस्ट्रक्ट प्लाझा उभारण्याचा प्रयत्न होत आहे. इथे मोठय़ा संख्येने येणाऱया कामगारवर्गासाठी आकर्षक ठिकाण बनवण्यात येत आहेत. या ठिकाणी नागरिकांना बसण्याची सुविधाही असेल. या विविध फुलझाडे, शोभेच्या झाडांमुळे परिसर फ्लायओव्हर जंक्शन आकर्षणाचे केंद्र बनेल. कलानगर फ्लायओव्हरच्या खाली ‘पब्लिक प्लाझा’ साकारण्यात येत आहे.

असे होणार काम

2828 स्क्वेअर मीटर जागेवर साकारले जाणार आहे. या कामासाठी सुमारे 4.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या ठिकाणी आकर्षक कारंजे, रंगीबेरंगी लायटिंग असेल. विविध प्रकारच्या झाडांमुळे ‘ग्रीन स्पेस’ तयार होईल. या ठिकाणी येणाऱयांना बसण्यासाठी बेंचेसची सुविधा असेल.