आम्ही जगज्जेते! आदित्य ठाकरे यांनी केले महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडर 19 महिला विश्वचषक हिंदुस्थानच्या महिला संघाने पटकावला आहे. इतिहासात पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिला संघाने विश्वचषक जिंकला आहे. सध्या संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत या संघाचे अभिनंदन केले आहे. ”आम्ही जगज्जेते…! क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या 19 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला धूळ चारली आणि पहिल्या जेतेपदावर भारताचे नाव कोरले. भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.