NEET Paper Leak – धर्मेंद्र प्रधान यांना हटवा, CBSC बोर्ड बडतर्फ करा; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या देशभरात NEET पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. तसेच त्यांना आलेला मनसीक ताण याचाही विचार करण्याची गरज आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलेच सुनावले आहे. पेपरफुटीतील दोषींवर कोर कारवाई करा, अन्यथा विकसित भारतच्या घोषणा पोकळ ठरतील, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोणतं जागतिक विद्यापीठ आपल्या शिक्षणाला गांभीर्याने घेणार आहे? केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना, संपूर्ण सीबीएसई बोर्डासोबत बडतर्फ केलं पाहिजे. शिक्षणातील अशा उघड भ्रष्टाचाराला देशातील सर्वोच्च शिक्षा झालीच पाहिजे! ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत!, असे ते म्हणाले.

NEET प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींना आणि CBSE मधील OSM च्या चुकीच्या व निष्काळजी अंमलबजावणीस जबाबदार असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, त्याशिवाय २०४७ च्या ‘विकसित भारत’च्या घोषणा पोकळ ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे.

या चुका दुरुस्त करून आपल्या शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा केल्याशिवाय भविष्यात अधिक चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवण्यातही काही अर्थ नाही. NEET आणि CBSE परीक्षांमधील अभूतपूर्व गोंधळ हा केवळ संबंधित बोर्ड आणि शिक्षण मंत्रालयाच्या अकार्यक्षमतेचा पुरावा नाही, तर आपल्या देशाच्या जागतिक प्रतिष्ठेला, विश्वासार्हतेला आणि भारतातील मेहनती, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेलाही धक्का देणारा आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच NTA आणि CBSE बोर्डातील जबाबदार सदस्यांना पदावरून हटविल्याशिवाय या परिस्थितीला सामोरे गेलेल्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकत नाही.NEET प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींना आणि CBSE मधील OSM च्या चुकीच्या व निष्काळजी अंमलबजावणीस जबाबदार असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, त्याशिवाय २०४७ च्या ‘विकसित भारत’च्या घोषणा पोकळ ठरतील आणि ह्या चुका दुरुस्त करून आपल्या शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा केल्याशिवाय भविष्यात अधिक चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवण्यातही काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.