
सामना ऑनलाईन । पंढरपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच चुकीच्या नेत्याला पुढे आणले. या नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचे 30 ते 40 वर्षांचे राजकारण फुकट गेले. पवारांनी आंबेडकर चळवळीची पिढीच बरबाद करून टाकली, असा घणाघात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पवारांनी चुकीच्या नेत्यांना पुढे आणल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील तो नेता स्वतःही पवारांच्या सोबत नाही, असे आनंदराज म्हणाले. रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांनी पवार यांच्यावर आरोप केले.



























































