
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, असे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे. या आंदोलनला पाठिंबा दिल्याबाबात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभआर मानले आहेत.
मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केले. ते म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या, युवकांच्या भविष्याचा विषय अभिजीत दीपके यांनी उचलला आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सत्ताधाऱ्यांचं पक्ष फोडाफोडीत लक्षं, इथे देशाचं नशीब फुटतंय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
अभिजीत दीपके हा युवक देशातील युवकांचा आवाज उठवतोय. हे युवक सुशिक्षित आहेत. 20 तारखेला त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. दीपके याने एक दावा केलाय की 20 तारखेच्या आता काही गुंड तिथे सोडून हिंसाचार माजवून हे आंदोलन उधळून लावण्याचा कांहीचा प्रयत्न आहे. हे हिणकस आणि नीच वृत्तीचं लक्षण. ते सर्व कुणासाठी लढतायत? देशातील सर्व तरुणांसोबत त्यांच्या पालकांनी देखील जागं व्हायला पाहिजे. उद्या अशी परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. हा विषय राजकीय नाही. हा देशाचा विषय आहे. देश जागा होत नाही तोपर्यंत बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही, असेही ते म्हणाले. या पाठिंब्याबाबत दीपके यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.


























































