
आयपीएलमधील यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या नावाच आवर्जून उल्लेख करावा लागतो. इतर संघांच्या तुलनेत चेन्नईचा चाहता वर्ग सर्वाधिक आहे. त्यामुळे महेंद्र सिंग धोनीसह चेन्नईचे खेळाडू, स्टाफ, प्रशिक्षक आणि संघ मालक यांच्याशी असणार चाहत्यांच नात अगदी जवळच आहे. चेन्नईच्या मागील 17 वर्षांच्या प्रवसाता मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच योगदाना मोलाचं राहिलं आहे. त्यांच्या 17 वर्षांच्या कार्यकाळात चेन्नईने 5 आयपीएल विजेतेपदे, 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी आणि विक्रमी 12 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारत क्रिकेट जगतात आपले वेगळे स्थान निर्माण केले. मात्र, त्यांचा हा प्रवास आता संपुष्टात आला आहे. या निर्णयामुळे इंडियन प्रीमियर लीग च्या इतिहासातील एका सर्वात यशस्वी आणि प्रदीर्घ काळाच्या भागीदारीचा अंत झाला आहे.
फ्लेमिंग आणि CSK व्यवस्थापनात झालेल्या सलोख्याच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. फ्लेमिंग 2008 मध्ये खेळाडू म्हणून चेन्नई संघात आले होते आणि 2009 मध्ये त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. या निरोपाच्या प्रसंगी संघाच्या मालक रूपा गुरुनाथ आणि व्यवस्थापकीय संचालक के. एस. विश्वनाथन यांनी फ्लेमिंग यांच्या योगदानाचा गौरव केला. रूपा गुरुनाथ म्हणाल्या की, फ्लेमिंग हे गेल्या दोन दशकांपासून आमच्या फ्रेंचायझीच्या अगदी जवळ राहिले असून त्यांनी संघाच्या संस्कृतीला आकार दिला. मैदान सोडले तरी ते नेहमी चेन्नईच्या वारशाचा भाग राहतील. तर के. एस. विश्वनाथन यांनी फ्लेमिंग यांच्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याच्या क्षमतेचे कौतुक करत, त्यांनी निर्माण केलेली नम्रता आणि सातत्याची संस्कृती संघाची खरी ओळख बनल्याचे सांगितले.
OFFICIAL ANNOUNCEMENT
The Super Kings and Head Coach Stephen Fleming have mutually decided to part ways.
Together, we shared one of the most successful and enduring partnerships in IPL history. The legacy you’ve built will continue to inspire us.With immense respect and… pic.twitter.com/qjvb4oZUuU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 13, 2026
आपल्या या 17-18 वर्षांच्या प्रवासाबद्दल स्टीफन फ्लेमिंग अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले, “क्रीडा जगतात 18 वर्षे हा एक मोठा कालखंड आहे आणि मी इथून फक्त कृतज्ञतेची भावना घेऊन जात आहे. चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षकपद सांभाळणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान होता.” आम्ही सोबत अनेक ऐतिहासिक विजय साजरे केले आणि कठीण प्रसंगांचा सामना केला, अशा आठवणी सांगत चेन्नई संघ नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि मी यापुढेही संघाला पाठिंबा देत राहीन, अशी भावना फ्लेमिंग यांनी व्यक्त केली.



























































