
इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची निवड करण्यात आली असून दुखापतग्रस्त हर्षित राणाच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी दुखापतग्रस्त वरुण चक्रवर्तीच्या जागी लेगस्पिनर रवी बिष्णोईची निवड करण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत हिंदुस्थानचा पराभव झाला, त्यातच संघाला मोठा धक्का बसला. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनाही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान हर्षितच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये अचानक वेदना जाणवू लागल्या. तपासणीत त्याला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या डाव्या हॅमस्ट्रिगलाही दुखापत झाली.





























































