
डाळ-तांदूळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर पडते. यावर सोपा उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही डाळ किंवा तांदूळ शिजवण्यासाठी ठेवता तेव्हा त्यात थोडेसे स्वयंपाकाचे तेल टाका. कुकरमध्ये स्टीलची वाटी ठेवली तरी डाळ वर येत नाही.
भात अनेकदा खूप ओला किंवा चिकट होत असेल तर तुम्ही त्यात लिंबाची पह्ड किंवा थोडे तूप टाकून भात शिजवा. यामुळे भात मऊ होईल तसेच चवही दुप्पट होईल.
तांदळाच्या प्रमाणापेक्षा दीडपट जास्त पाणी घ्या आणि आता हे पाणी चांगले उकळूद्या. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ टाकून शिजवा.


























































