फ्रॉड अक्षय खानविलकरला कुणाचा आशीर्वाद, ठाणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून आठ जणांना लाखोंचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

ठाणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेसह आठजणांची १७ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अक्षय खानविलकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वर्वीदेखील अक्षयने अनेकांना गंडा घातला असून त्याला नेमका कुणाचा आशीर्वाद असा सवाल केला जात आहे. क्राईम दरम्यान याप्रकरणी ठाणे नगर विटावा येथे राहणाऱ्या स्वाती देशमुख यांचा मुलगा चिरायू देशमुख याला ठाणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष अक्षय खानविलकर याने दाखवले.

 

त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ आणि उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर द्यायची असे ठरले. त्यानुसार देशमुख यांनी गुगल पेद्वारे १ लाख ५० हजार रुपये अक्षयच्या खात्यावर पाठवले. मात्र त्यानंतर नोकरीबाबत वारंवार विचारणा करूनही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान पैसे परत करण्यासाठी आरोपीने आयडीएफसी बँकेचा धनादेश दिला. मात्र तो बाऊन्स झाला. याबाबत जाब विचारला असता अक्षयने पैसे परत देण्याऐवजी तक्रारदार स्वाती देशमुख व त्यांच्या भावाला हातपाय तोडण्याची तसेच करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने इतर सातजणांना नोकरी देतो असे सांगून १५ लाख ९५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

कोर्ट नाका परिसरात झालेल्या बैठकीत एका उमेदवारासाठी पाच लाख रुपये दागिने लंपास
ठाण्यातील कॅसल मिल परिसरातील एका सदनिकेत दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नवनीत भारत सोसायटीत राहणाऱ्या संगीता वायकर या भाजीपाला घेण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटातील मंगळसूत्र, दोन चेन, कानातले टॉप्स, पैजन आणि ५० हजार रुपयांची रोकड असा ५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला.

 

तरुणावर हल्ला
ठाण्यात सीपी कार्यालयासमोरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीने तरुणावर दगडफेक करून त्याच्या कानाला चावा घेतला. अजय पारीख असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हा क्रांतीनगर येथे आईकडे जात होता. तो सीपी कार्यालयासमोर आला असता एका माथेफिरूने त्याच्यावर दगड फेकला. नंतर त्याच्या कानाला चावा घेतला.