असं झालं तर… बँक खाते बंद पडल्यास?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँक खाते बंद पडल्यास किंवा गोठवल्यास, तुमचे सर्व आर्थिक व्यवहार, जसे की यूपीआय, पैसे काढणे आणि जमा करणे, तात्काळ थांबतात.

निष्क्रिय खाते 10 वर्षांनंतर ते ‘बंद’ वर्गवारीत जाते. खात्याचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास किंवा सायबर सेलकडून तक्रार असल्यास खाते गोठवले जाते.

आयकर विभाग किंवा जीएसटी विभागाच्या आदेशानुसार खाते गोठवले जाऊ शकते. खात्यात आवश्यक तेवढी रक्कम न ठेवल्यास बँक दंड आकारून खाते बंद करू शकते.

खाते पुन्हा चालू करण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जा आणि खाते बंद पडण्याचे कारण जाणून घ्या. ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा बँकेत जमा करा.

तुमचे खाते निष्क्रिय असेल, तर बँक फॉर्म भरून आणि एखादा लहान व्यवहार (उदा. 100 रुपये जमा करणे) करून तुम्ही ते पुन्हा चालू करू शकता.