एक हजाराची लाच स्वीकारतांना अहमदपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

दाखल झालेल्या गुन्ह्यात जामिन मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून 1 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या अहमदपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी उल्हास सखाराम चव्हाण यास नांदेड येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या कारणावरुन पोलीस कर्मचारी उल्हास चव्हाण याने 5 हजार रुपयांची लाच मागीतलेली होती. याची तक्रार नांदेड येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आलेली होती. त्यावरुन नांदेडच्या पथकाने अहमदपूर येथे सापळा लावला आणि 1 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी उल्हास चव्हाण यास रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले, कर्मचारी एकनाथ गंगातीर्थ, गणेश तालकोकूलवार, दर्शन यादव आणि इतरांनी कारवाईत भाग घेतला.