
माथेरान घाट रस्त्याकर रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छोटय़ा महिंद्रा कॅरी टेम्पोचा भीषण अपघात झाला. यामध्ये 20 पर्यटकांपैकी आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना नेरळ येथील सुदिन नर्सिंग होम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. टेम्पोमध्ये महिला पर्यटकांचाही समाकेश होता. मात्र, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

























































