
अभिनेता ऋतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. हृतिकच्या कारकीर्दीतील ही सर्वात दमदार भूमिका मानली जाते. ‘विक्रम वेधा’ची एंट्री आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाली आहे. त्यातील हृतिकच्या जबरदस्त भूमिकेने नेटिजन्स खूश झाले आहेत. ते हृतिकची जोरदार प्रशंसा करताना दिसत आहेत.
एकीकडे ओटीटीवर क्राईम ड्रामाचे प्रमाण कमी होत असताना ‘विक्रम वेधा’बद्दल मात्र उत्सुकता होती. अनेक जण केवळ हृतिकसाठी हा चित्रपट बघत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. अभिनयाचा मास्टर क्लास अशा शब्दांत त्याला दाद देत आहेत. लवकरच हृतिक ‘फायटर’ या चित्रपटात दिसेल. ही बॉलीवूडची पहिली एरियल अॅक्शन मूव्ही असल्याचा दावा केला जात आहे. सिद्धार्थ आनंद ‘फायटर’चे दिग्दर्शक आहेत.

























































