
लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या आउटफिट्समुळे चर्चेत आहेत. या शोदरम्यान अनेक सेलेब्सचे स्टनिंग लूक पाहायला मिळत आहेत. नुकतेच या शोमधील रॅम्प वॉकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथे अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने या शो दरम्यान बोल्ड आणि स्टायलिश लूक केले होते. या शोसाठी तिने काळ्या रंगाचा लॉन्ग स्कर्ट आणि स्ट्रेपलेस ब्रालेटची निवड केली होती. त्यात ती ग्लॅमरस दिसत होती. यावर तिने स्मोकी आईज, केस मोकळे सोडले होते आणि न्यूड मेकअप केला होता. चाहत्यांनी तिचे फोटो पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.


























































