अभिनेत्री काजल अगरवाल अडकली लग्नबंधनात

दक्षिणेसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही नावाजलेली अभिनेत्री काजल अगरवाल ही आज व्यावसायिक गौतम किचलूसोबत विवाहबद्ध झाली आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक व काही मित्र मैात्रिणींनाच या सोहळ्याचे आमंत्रण होते. काजलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महिनाभरापूर्वी काजलने इंटिरिअर डिझायनर असलेल्या गौतम किचलू सोबत लग्न ठरल्याचे जाहीर केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाअगोदरच्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या