‘अधीश’वर अखेर राणेंचा हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यामधील बेकायदा बांधकाम स्वतःच पाडण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर पालिका अधिकारी पाहणी करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. येत्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण बेकायदा बांधकाम पाडण्यात येणार आहे.

असे आहे बेकायदा बांधकाम

  • तळघर – सर्व्हिस एरिया, पार्पिंग एरियात बांधकाम.
  • पहिला ते तिसरा मजला – गार्डनमध्ये खोली.
  • चौथा मजला –गच्चीवर खोलीचे बांधकाम
  • पाचवा मजला – गार्डन टेरेसमध्ये खोली बांधली.
  • सहावा मजला – पार्ट टेरेसमध्ये खोलीचे बांधकाम.