आदित्य ठाकरे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या विविध शाळांमध्ये मोफत दंतचिकित्सा मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत बुधवारी वांद्रे एच पश्चिम वॉर्डमधील गजदरबांध माणिकजी शाळा आणि वांद्रे पेटीट या दोन शाळांमधील सुमारे 1500 विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात आली. या शिबिराला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

पालिका शाळांतील मुलांसाठी महापालिका शिक्षण विभाग आणि डॉ. मयेकर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन महिन्यांपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे एच पश्चिम वॉर्डमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी डॉ. सलोनी मयेकर आणि शिक्षण समिती सदस्य राहुल कनालदेखील उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत पालिका शाळांतील दीड लाख विद्यार्थ्यांची दंततपासणी करून त्यांना मोफत ब्रश आणि टुथपेस्टचे वाटप केले जाणार आहे.