मुलुंडकरांच्या हक्कांसाठी शिवसेना आक्रमक, फसवा आमदार नको; काम करणारा लोकप्रतिनिधी हवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे मुलुंडमधील नागरिकांच्या हक्कांसाठी आक्रमक झाले आहेत. मुलुंडकरांची वारंवार फसवणूक आणि दिशाभूल करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘रिझाईन मिहीर कोटेचा’ ही स्वाक्षरी मोहीम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज सुरू करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांनी स्वतः स्वाक्षरी करून या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार कोटेचा यांच्या विविध वक्तव्यांचा आणि उपलब्ध पुराव्यांचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी पीएपी प्रकल्प, धारावी पुनर्वसन प्रकल्प, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित भूखंड गिळंपृत करणे आणि डंपिंग ग्राऊंडच्या मुद्दय़ावरून सवाल उपस्थित केले.

डंपिंग ग्राऊंडवर सार्वजनिक उद्यान विकसित करा

पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध असतानाही मुलुंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित भूखंडाचे आरक्षण बदलण्याची मागणी का केली जात आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. मुलुंडच्या हरी ओम नगर येथील 64 एकर डंपिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स उभारण्याऐवजी सर्वसामान्य मुलुंडकरांसाठी मोठे सार्वजनिक उद्यान विकसित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जेन झींमुळे देश एक झालाय म्हणून दंगली घडवण्याचे षड्यंत्र

गणपतीच्या दिवसांत देशात दंगली घडवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांकडून होऊ शकतो असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत आदित्य ठाकरे यांना यावेळी विचारले असता त्यांनीही पुठेतरी तसे षड्यंत्र दिसत आहे, असे मत व्यक्त केले. जेन झी एकत्र आले आहेत, पुठेतरी भाजपच्या विरोधात देश एकत्र आला. त्यामुळे दंगली घडवून सत्ताधाऱयांना धार्मिक वाद निर्माण करायचा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.