राहुरीत निवडणुकीसासाठी प्रसासन सज्ज; प्रशासनाकडून तयारीला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना प्रतिनिधी । राहुरी

आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी राहुरी मतदार संघात महसूल विभागाची निवडणुक यंत्रना सज्ज झाली आहे.23 एप्रिल रोजी दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या दृष्टीने महसूल विभागाकडून आचारसंहितेच्या पालनाकडे लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दक्षिण लोकसभा मतदारसंघात राहुरी तालुक्यातील 64 गावांचा समावेश असून मतदारांची संख्या एक लाख 67 हजार 971 आहे. मतदानासाठी 180 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

राहुरी मतदार संघातील नगर तालुक्याच्या 30 गावांचा समावेश असून येथील मतदारसंख्या 64 हजार 110 तर पाथर्डीच्या 36 गावात 52 हजार 312 मतदार आहेत.पाथर्डीसाठी 59 तर नगरसाठी 69 मतदान केंद्रे आहेत. या तीन तालुक्यातील मतदान केंद्रावर 1695 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 10 मार्चपासुन आचारसंहितेचे पालन सुरू करण्यात आले आहे. या बाबत नगर परिषद प्रशासन, तलाठी यांना सूचना देऊन सार्वजनीक मालमत्ता तसेच शासकीय ठिकाणी असलेले 1700 बोर्ड,451 झेंडे,69 बॅनर्स काढुन टाकणे तसेच 169 कोनशिला,26 जाहिराती झाकण्याचे काम करण्यात आले आहे.

आचारसंहितेचे पालन होण्यासाठी वाहने तपासणी पथक, व्हिडीओ चित्रीकरण, वाहने तसेच साहित्य वापर,निवडणुकीत होणारा खर्च यावर देखरेख ठेवण्यासाठी चार भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. सोशल मिडीयावर केला जाणार प्रचार, स्लाईड शो, छपाई ही माहिती निवडणूक विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राहुरी मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या 816 आहे. दिव्यांग मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी वाहनव्यवस्था करण्यात आली आहे.