
रत्नागिरीच्या काळाबादेवी समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजण्याचा सुमारास घडली. काळाबादेवीच्या टेमरेवाडी येथे राहणाऱ्या शंकर गंगाराम कांबळे (59) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांचा मुलगा उद्देश शंकर कांबळे (24) याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शंकर हे मंगळवारी सकाळी काळाबादेवी समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना त्यांचा तोल गेला आणि ते समुद्रात पडले. मात्र भरतीची वेळ असल्याने त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

























































