नोकरी गमावलेल्यांना ३० दिवसांनंतर ७५ टक्के पीएफ काढता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरी गेल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्यामधून ३० दिवसांनंतर ७५ टक्के रक्कम काढण्यास परवानगी देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली. पीएफमधून ७५ टक्के रक्कम काढल्यानंतर संबंधित बेरोजगार कर्मचारी आपले पीएफचे खाते सुरू ठेवू शकतो. खाते चालू ठेवण्याचा उपयोग संबंधित बेकार कर्मचाऱ्यास दुसरी नोकरी मिळाल्यानंतर होईल असे स्पष्ट केले आहे. पूर्वी बेकार कर्मचाऱ्यांना ३० दिवसांत ६० टक्केच पीफ काढण्याचा प्रस्ताव होता.