टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा; गौतम गंभीर नव्हे तर ‘हा’ दिग्गज खेळाडू असणार मुख्य प्रशिक्षक

टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया 6 जूलैला झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. तसेच T20 World Cup 2024 नंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी झिम्बाब्वे दौऱ्यावर गौतम गंभीर ऐवजी टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूवर प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा 6 जुलै पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिचा पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यापुर्वी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली तरीसुद्धा गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच व्हि.व्हि.एस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यापासून गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

व्ही.व्ही.एस लक्ष्मण नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (NCA) संचालक आणि टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2022 साली टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप उंचावला होता. या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हि.व्हि.एस लक्ष्मण होता. लक्ष्मण ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 134 कसोटी सामन्यांमध्ये 45.97 च्या सरासरीने 8781 धावा केल्या आहेत. तसेच 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2338 धावा केल्या आहेत.