
अहमदाबाद येथील अर्हम ओम तलसानिया हा सहा वर्षांचा मुलगा जगातील सर्वात कमी वयाचा प्रोग्रॅम डेव्हलपर बनला आहे. पायथॉन प्रोग्रॅमची परीक्षा उत्तम गुणांनी पास झालेल्या अर्हमच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
अर्हमचे वडील ओम तलसानिया एका मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. अर्हम सध्या इयत्ता दुसरीत आहे. तो जेव्हा दोन वर्षांचा होता, तेव्हाच वडिलांनी त्याला टॅबलेट्स आणि कॉम्प्युटर हाताळायला शिकवले. अर्हम चार वर्षांचा झाला तेव्हा त्याला वडिलांनी पायथॉन लँग्वेजची कोडिंग शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर अर्हम स्वतः असे अॅप्स बनवायला लागला. त्याला प्रोफेशनल ट्रेनिंग मिळाल्यानंतर त्याने पायथॉन परीक्षेची तयारी केली आणि जानेवारी 2020 मध्ये मायक्रोसॉफ्ट सेंटरमध्ये परीक्षा दिली. जे मोठ्यामोठ्यांना कठीण जातं, ते अर्हमने सहाव्या वर्षी साध्य केले. अगदी 1000 पैकी 900 मार्क त्याने मिळवले.
























































