हिंदुस्थानी झारा चर्चेत! ‘एआय’ मॉडेल्सची सौंदर्य स्पर्धा; 11 लाखांचे बक्षीस

मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्ससारख्या सौंदर्य स्पर्धांनंतर आता जगातील पहिली एआय सौंदर्य स्पर्धा होणार आहे. एआय मॉडेल्समधील ही स्पर्धा ब्रिटनच्या फॅनह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्स (डब्ल्यूएआयसीए)च्या सहकार्याने आयोजित केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात, 1500 सहभागींमधून टॉप 10 एआय मॉडेल निवडण्यात आले आहेत. एआय मॉडेल झारा शतावरीचादेखील स्पर्धेतील टॉप 10 मध्ये समावेश आहे. झारा हे मोबाईल ऍड एजन्सीचे सह-संस्थापक राहुल चौधरी यांनी तयार केले आहे.

कोण आहे झारा?

झारा एक आरोग्य आणि फिटनेस प्रभावशाली एआय आहे. तिचे एक सोशल मीडिया पेजदेखील आहे. जिथे ती आरोग्य आणि फॅशनशी संबंधित टिप्स देत असते. इंस्टाग्रामवर तिचे 8 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. झारा जून 2023 पासून पीएमएच बायोकेअरची ब्रँड ऍम्बेसेडर आहे. झारा हेल्दी खाण्याशी संबंधित गोष्टी सांगत असते. झारा आशियामधून निवडलेल्या 2 मॉडेलपैकी एक आहे.