बिहारमध्ये मोहम्मद अख्तर यांनी आपली कोट्यवधींची जमीन आपल्या दोन हत्तींच्या नावे केली होती. त्यांचा फुलवारीशरीफमध्ये गोळ्या घालून खून घालून खून करण्यात आला आहे. मोहम्मद अख्तर हे ऐरावत ट्रस्टचे मालक होते, हत्तीच्या देखरेखींचे ते काम करत असत. बिहार सरकारनेही त्यांना अनेक वेळा हत्तींच्या देखभालीसाठी पाचारण केले होते.
अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. त्यांनी आपली आपली पाच कोटी रुपयांची जमीन या हत्ती आणि पत्नींच्या नावे केली होती. अख्तर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यापैकी एक मुलगा तुरुंगात आहे. हत्ती सांभाळण्यासह जमीनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहारही अख्तर करत होते.
मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी अख्तर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी आपल्या घराची दारे खिडक्या बंद केली. हल्लेखोर पळून गेल्यानंतर काही ग्रामस्थांनी अख्तर यांना एम्समध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकर्यांचा शोध सुरू आहे.




























































