
रिलायन्सने काही आठवड्यांपूर्वी आपल्या JioPhone Next स्मार्टफोनच्या EMI आधारित प्लानची घोषणा केली होती. यानंतर Airtel नेही आपला पहिला स्मार्टफोन प्रोग्राम सादर केला होता. जेणेकरून हिंदुस्थानी ग्राहक सहज स्मार्टफोन खरेदी करू शकतील. Airtel च्या या पहिल्या स्मार्टफोन प्रोग्रामवर 6,000 रुपयांचा कॅशबॅक, एअरटेल अॅपचा ऍक्सेस आणि इतर बऱ्याच सेवा ग्राहकांना मिळणार आहेत. आज आपण याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
कधी मिळणार कॅशबॅक?
कंपनी या प्रोग्राम अंतर्ग स्मार्टफोन खरेदीवर 6 हजार रुपयांचा कॅशबॅक देत आहे. हा कॅशबॅक 12 हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनवर मिळणार आहे. ग्राहकांना Airtel Payment बँकमध्ये 2 ईएमआयमध्ये हा कॅशबॅक मिळणार आहे. पहिला ईएमआय 2 हजार रुपये 18 महिन्यांनंतर आणि उर्वरित 36 महिन्यांनंतर जमा केला जाईल.
कॅशबॅक मिळविण्यासाठी युजर्सला त्यांच्या आवडीनुसार 249 रुपये किंवा त्याहून अधिक मासिक प्लॅनसह सतत आपला फोन रिचार्ज करावा लागणार आहे. यासाठी आपण Redmi 9A या स्मार्टफोनचे उदाहरण घेऊन हे समजून घेऊ. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. त्यामुळे यूजर्सला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 6,999 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी 36 महिन्यांत किमान 249 रुपयांचे रिचार्ज करावा लागेल. 36 महिन्यांनंतर युजर्सला 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे या फोनची किंमत फक्त 999 रुपये इतकी होईल.
























































