
आजपासून देशभरात क्रिकेटची धामधूम सुरू झाली असताना एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी विस्तारित लाभांसह स्पेशल क्रिकेट प्लान्सची घोषणा केली आहे. ग्राहकाला 99 रूपयांच्या प्लानमध्ये आता 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा मिळेल. तर 49 रूपयांच्या प्लानमध्ये एका दिवसासाठी 6 जीबी डेटा मिळेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
एअरटेल डीटीएच स्पेशल रिचार्ज ऑफर्ससाठी स्टारसोबत सहयोग करत आहे. तसेच ग्राहकांना स्टार स्पोर्टस् पोर्टफोलिओमधील त्यांच्या आवडत्या चॅनेल्सची भर करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्सवर एअरटेल ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेमध्ये त्वरित क्रिकेट सामन्याचे प्रसारण पाहता येण्यासाठी क्विक-अॅक्सेस प्रोमो-रेल सादर करत आहे.
ओपनसिग्नल अहवालानुसार भारती एअरटेल वापरकर्ते इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) वर्ल्ड कप 2023 स्टेडियम्समध्ये सर्वोत्तम नेटवर्क अनुभव आणि सर्वात गतीशील अपलोड स्पीड्सचा आनंद घेऊ शकतात. लोकसंख्येनुसार देशातील 4प मोठ्या शहरांमध्ये मोबाइल लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग अनुभवाच्या दर्जामध्ये एअरटेलने इतर ऑपरेटरच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली. यापैकी बहुतांश शहरांमधील लाइव्ह व्हिडिओ एक्स्पीरिअन्स, तसेच 5जी लाइव्ह व्हिडिओ एक्स्पीरिअन्सचा समावेश होता.
























































