Ajit Pawar on Gautami Patil ‘ती बैलासमोर नाचेल नाहीतर…’, अजित पवारांची फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौतमी पाटील हे नाव माहिती नाही असा एकही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. लग्नापासून ते वाढदिवसापर्यंत आणि यात्रेपासून तमाशापर्यंत सध्या तिचीच चर्चा आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी तरुणाईची तुफान गर्दी उसळते. मात्र पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमीने एका बैलासमोर डान्स केला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी गौतमी पाटील हिच्या डान्सवर प्रतिक्रिया दिली. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या याबाबत प्रश्न विचारले असता अजित पवार यांनी तुला काय वाईट वाटले. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय? असा सवाल केला.

‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचे का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अनेक गावांमध्ये सध्या यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. सध्या गौतमीचे नाव गाजत असून, पाटीलबाईंना आणा, याबद्दल मी सुचवले होते. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे.

बैलासमोर नाचल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडे पाहते. लहान मुलाचे बारसे आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावले तर तिला नाचावच लागते. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)